मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Rainy Season and Ayurved

पावसाळा आणि आयुर्वेद भाग 3  Rainy Season and A yurved पावसाळ्यामध्ये होणारे मणक्यांचे - सांध्यांचे आजार - Spinal Disorders / Joint Disorders in rainy season पावसाळा - मणक्याचे आजार - बस्ती यापूर्वी आपण मणक्यांच्या आजारामध्ये असणारी कारणे पाहिली , आता या आजारामध्ये दिसणारी लक्षणे पाहूया . मणक्यांच्या आजारामध्ये दिसणारी लक्षणे 1. कंबर दुखणे . 2. मान दुखणे . 3. कुबड निघणे . 4. हात दुखणे , मुंग्या येणे , बधिरपणा जाणवणे . 5. पाय दुखणे , मुंग्या येणे , बधिरपणा येणे . 6. पाठ जखडणे , कंबर जखडणे , मान जखडणे . 7. हाताला पायाला कोणतीही संवेदना न जाणवणे . 8. सकाळी झोपेतून उठताना प्रचंड वेदना होणे. 9. चालता न येणे . आतापर्यंत सामान्यता दिसणारी लक्षणे पहिली आता थोडे आधुनिक विचाराने सविस्तर पाहूया . Joint pain Tingling, Numbness sensation  Cervical spondylitis Lumbar spondylitis Sciatica Ankolityng spondylitis Sleep disc Spinal disc herniation Degenerative changes in spine  वैद्य श्रीधर राजेंद्र पवार , आरोग्यवेल आयुर्वेद , रहिम...
पावसाळा आणि आयुर्वेद भाग २   Rainy season and A yurved पावसाळ्यामध्ये होणारे मणक्यांचे - सांध्यांचे आजार - spinal disorders / joint disorders in rainy season मणक्याचे किंवा सांध्यांचे आजार होण्याची कारणे याबाबत आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत . आहार शिळे पदार्थ , दही , आंबवलेले पदार्थ , तेलकट पदार्थ , मिरची , मसालेदार पदार्थ , बेकरीचे पदार्थ , फास्ट फूड , लोणचे , पापड . मिल्क शेक , दूध आणि फळ एकत्र करून खाणे , शिकरण . अति उपवास , अवेळी जेवण . विहार अल्प झोप - अति जागरण . अति प्रमाणात व्यायाम ताकतीपेक्षा जास्त. अति व्यवाय - नियम सोडून मैथुन करणे . अतिशय काम / श्रम करणे . अतिशय पायी चालणे . वेड्या वाकड्या हालचाली करणे . मलमूत्रादी वेग रोखणे . यामध्ये लघवीला किंवा संडासला आले असता न जाणे . मलमूत्रादि वेग आले नसताना ते निर्माण करणे . अतिशय वजनदार वस्तू डोक्यावरून किंवा खांद्यावरून नेणे. अतिअध्यायन - एकाच स्थितीमध्ये - एकाच ठिकाणी खूप वेळ बसणे. अतिशय मोठ्याने बोलणे . मानेच्या आजाराशी निगडित . अतिशय वेगा...
पावसाळा आणि आयुर्वेद 1    Rainy season and Ayurveda       वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. असे ढगाळ वातावरण , सारखा पाऊस पडणे , दमट , कोंदट , रोगट हवा , विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये , अभ्यास करु नये , वेदपठण करु नये , असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ , निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे. आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रकोपावर ’बस्ती’ हा पंचकर्मांपैकी एक महत्वाचा उपक्रम आयुर्वेदात सांगितलेला आहे. विविध औषध...
२५ मे जागतिक थायराइड दिवस आज समाजामध्ये थायराइड ग्रंथीशी निगडीत आजारांची संख्या बर्याच प्रमाणात वाढलेली दिसून येते . पूर्वीच्या काळी महिलांच्यामध्ये क्वचित दिसणारे आजार आज महिला , पुरुष , लहान मुले , मुले यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत . भारतातील थायराइड ग्रंथीशी निगडीत आजारांचे प्रमाण हे लोकसंखेच्या ११ % एवढे २०१८ च्या रिपोर्ट नुसार दिसून आलेले आहे . या वर्षभरात या मध्ये वाढ झाली असणार हे नक्कीच .        यामध्ये हायपो थायरोइड , हायपर थायराइड , थायराइड कॅन्सर , गलगंड हे महत्वाचे आजार दिसून येतात. आयुर्वेदानुसार सर्व आजारांचे महत्वाचे कारण आहाराचे पचन व्यवस्थित न होणे हे असते . थायराइडचे आजारामध्ये सुद्धा आहार पचन न होणे हे महत्वाचे कारण दिसते. आयोडीन ची कमतरता , हायपर थायराइड या आजारामध्ये दिसणारी लक्षणे या बाबत अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे . भूक वाढणे सारखा थकवा जाणवणे. उष्णता सहन न होणे . वारंवार जुलाब होणे , उलटी होणे हृदयाची धडधड वाढणे , काम केल्यावर श्वास वाढणे सर्व शरीरावर घाम येणे. केस गळणे. हायपो थायराइड या आजारामध्ये दिसणारी लक्षणे या बाबत ...
नाकातून रक्त येणे   Epistaxis . उन्हाळा या ऋतूमध्ये सामान्यता दिसून येणारी समस्या म्हणजे नाकातून रक्त येणे . उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये असणारी उष्णता आणि कोरडेपणा यामुळे शरीर आणि नाकपुड्या यामध्ये कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणारा ओलावा कमी होवून तिथे जास्त प्रमाणात कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या अतिशय लहान व त्वचेला लागून असतात त्यामुळे त्यांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी तिथे ओलावा आणे आवश्यक असते . यामध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते . नाकातून रक्त येण्याची कारणे ? नाकाला जखम होणे कष्टाचं काम उच्च रक्तदाब उंचीवरच्या प्रदेशात जाणे नाक फार जोरानं शिंकरणे उन्हामध्ये काम केल्यानंतर / उन्हामध्ये फिरल्याने नाकातून रक्त आल्यास करायचे उपाय खाली बसावे थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही थंड , ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित होऊन रक्तस्त्राव थांबेल. रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर , त...