मुख्य सामग्रीवर वगळा
२५ मे जागतिक थायराइड दिवस
आज समाजामध्ये थायराइड ग्रंथीशी निगडीत आजारांची संख्या बर्याच प्रमाणात वाढलेली दिसून येते . पूर्वीच्या काळी महिलांच्यामध्ये क्वचित दिसणारे आजार आज महिला , पुरुष , लहान मुले , मुले यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत . भारतातील थायराइड ग्रंथीशी निगडीत आजारांचे प्रमाण हे लोकसंखेच्या ११ % एवढे २०१८ च्या रिपोर्ट नुसार दिसून आलेले आहे . या वर्षभरात या मध्ये वाढ झाली असणार हे नक्कीच .
       यामध्ये हायपो थायरोइड , हायपर थायराइड , थायराइड कॅन्सर , गलगंड हे महत्वाचे आजार दिसून येतात. आयुर्वेदानुसार सर्व आजारांचे महत्वाचे कारण आहाराचे पचन व्यवस्थित न होणे हे असते . थायराइडचे आजारामध्ये सुद्धा आहार पचन न होणे हे महत्वाचे कारण दिसते. आयोडीन ची कमतरता ,
हायपर थायराइड या आजारामध्ये दिसणारी लक्षणे या बाबत
अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे .
भूक वाढणे
सारखा थकवा जाणवणे.
उष्णता सहन न होणे .
वारंवार जुलाब होणे , उलटी होणे
हृदयाची धडधड वाढणे , काम केल्यावर श्वास वाढणे
सर्व शरीरावर घाम येणे.
केस गळणे.


हायपो थायराइड या आजारामध्ये दिसणारी लक्षणे या बाबत
वजन वाढणे.
थंडी सहन न होणे .
थकवा येणे .
पोट साफ न होणे , संडासला खडा होणे .
त्वचा कोरडी पडणे ,
केस कोरडे होणे .
डिप्रेशन मध्ये जाने
केस गळणे

उपचार / थायराइड चे आजार होऊच नयेत म्हणून -
यामध्ये लाइफस्टाइल मनेजमेंट हे सर्वात महत्वाचे आहे .
वेळेवर आहार सेवन करावा .
नियमित व्यायाम करावा .
औषधोपचार वेळेवर घ्यावा .
औषधोपचार मध्ये आयुर्वेदामधील कांचनार या वनस्पतीचा विशेष फायदा होत असलेला दिसून येतो . त्यासोबतच पचन चागले होण्यासाठी इतर आयुर्वेदातील औषधे वापरता येतात .

वैद्य श्रीधर राजेंद्र पवार
आरोग्यावेल आयुर्वेद , रहिमतपूर , सातारा
मोबा :- ९४०४४०५७०६ , ९५९५५९९८७८


 .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿

  पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿   पंचकर्म ही आयुर्वेदामधील एक अत्यंत प्रभावी आणि पूर्णपणे शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी करणारी चिकित्सा पद्धत आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (आमा) बाहेर फेकले जातात आणि शरीराचे संतुलन पुनर्संचयित होते. यामुळे आरोग्यात सुधारणा होऊन समग्र कल्याण प्राप्त होते.   पंचकर्माचे फायदे:  1. शरीराची सखोल शुद्धी 🧘‍♀️      पंचकर्माद्वारे शरीरात जमलेले विषारी पदार्थ (आम) बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराच्या सर्व स्तरांवर शुद्धी होऊन आरोग्यात सुधारणा होते.   2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे 💪      पंचकर्मामुळे शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलित होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.   3. पाचनशक्ती आणि चयापचय सुधारणे 🍃      पंचकर्मातील विरेचन आणि बस्ती या चिकित्सांमुळे पाचनशक्ती सुधारते आणि चयापचय प्रक्रिया संतुलित होते.   4. ताण-तणाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळवणे 🧠       शिरोधारा (कपाळावर...

रक्तमोक्षण पंचकर्म: आयुर्वेदातील रक्तशुद्धीकरणाची प्रभावी पद्धत

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा शरीरातील दोष आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. पंचकर्मातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रक्तमोक्षण . हे एक असे उपचार आहे ज्यामुळे रक्तशुद्धीकरण करून शरीरातील विकार दूर केले जातात. रक्तमोक्षणामुळे त्वचाविकार, संधिवात, आणि पित्ताशी संबंधित विकारांवर प्रभावी उपचार केला जातो. चला तर मग जाणून घेऊया रक्तमोक्षण पंचकर्माचे महत्त्व, फायदे आणि प्रक्रिया. रक्तमोक्षण म्हणजे काय? रक्तमोक्षण हा पंचकर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत शरीरातील दूषित रक्त बाहेर काढले जाते, ज्यामुळे शरीरातील दोषांचे (विशेषतः पित्त आणि रक्तज विकार) शुद्धीकरण होते. रक्तमोक्षणासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, जसे की शृंग - कपिंग थेरपी ( सिंंगाचा वापर), जलौका (जळू), किंवा सुईद्वारे रक्त काढणे. या पद्धतीने शरीरातील दूषित रक्त बाहेर काढून नवीन रक्ताची निर्मिती होते आणि विविध विकारांवर उपचार केला जातो. रक्तमोक्षण पंचकर्माचे फायदे रक्तशुद्धीकरण : रक्तमोक्षणामुळे दूषित रक्त बाहेर काढले जाते आणि शरीरात शुद्ध रक्ताचा प्रवाह सुरू होतो. यामुळे त्वचेवरील विकार, पित्ती, आणि अन्य रक्तवि...

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...