पावसाळा आणि आयुर्वेद भाग २  Rainy season and Ayurved

पावसाळ्यामध्ये होणारे मणक्यांचे - सांध्यांचे आजार -

spinal disorders / joint disorders in rainy season





मणक्याचे किंवा सांध्यांचे आजार होण्याची कारणे याबाबत आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत .



आहार

शिळे पदार्थ ,

दही , आंबवलेले पदार्थ , तेलकट पदार्थ, मिरची,मसालेदार पदार्थ , बेकरीचे पदार्थ , फास्ट फूड ,लोणचे , पापड .

मिल्क शेक , दूध आणि फळ एकत्र करून खाणे , शिकरण .

अति उपवास, अवेळी जेवण .



विहार

अल्प झोप - अति जागरण .

अति प्रमाणात व्यायाम ताकतीपेक्षा जास्त.

अति व्यवाय - नियम सोडून मैथुन करणे .

अतिशय काम / श्रम करणे .

अतिशय पायी चालणे .

वेड्या वाकड्या हालचाली करणे .

मलमूत्रादी वेग रोखणे . यामध्ये लघवीला किंवा संडासला आले असता न जाणे .

मलमूत्रादि वेग आले नसताना ते निर्माण करणे .

अतिशय वजनदार वस्तू डोक्यावरून किंवा खांद्यावरून नेणे.

अतिअध्यायन - एकाच स्थितीमध्ये - एकाच ठिकाणी खूप वेळ बसणे.

अतिशय मोठ्याने बोलणे . मानेच्या आजाराशी निगडित .

अतिशय वेगात धावणे.

खड्यावरून / लांब किंवा उंचीवरून उड्या मारणे .

उड्या मारत चालणे .

अति प्रमाणात पोहणे .

वाहनावरून  गाडी वरून अति प्रमाणात प्रवास

अति प्रमाणात पायी चालणे .



मानसीक

अति प्रमाणात चिंता , शोक , क्रोध, भय , काम , अति त्रास .



काळ

पावसाळा , पावसाळा ऋतू शिवाय आकाशात ढग आल्यास .



आघात

उंचीवरून , गाडीवरून पडणे .

सांधे , हाड मोडणे .

अति दाब पडणे किंवा दाबले जाणे .

मार लागणे .



भाग 2 मध्ये ज्या कारणामुळे वाताचे आजार / मणक्याचे / सांध्यांचे आजार होऊ शकतात याबाबत आपण माहिती घेतली . भाग 3 मध्ये यामध्ये दिसणारी लक्षणे याबाबत माहिती घेणार आहोत .



वैद्य श्रीधर राजेंद्र पवार ,

आरोग्यवेल आयुर्वेद , रहिमतपूर , सातारा

मोबा 9404405706, 9595599878



आरोग्यवेल आयुर्वेद फेसबुक पेज







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿

रक्तमोक्षण पंचकर्म: आयुर्वेदातील रक्तशुद्धीकरणाची प्रभावी पद्धत

हिवाळ्यात अभ्यंगाचे फायदे: त्वचा व शरीरासाठी संजीवनी