पावसाळा आणि आयुर्वेद भाग २ Rainy season and Ayurved
पावसाळ्यामध्ये
होणारे मणक्यांचे - सांध्यांचे आजार -
spinal disorders /
joint disorders in rainy season
मणक्याचे किंवा सांध्यांचे आजार होण्याची
कारणे याबाबत आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत .
आहार
शिळे पदार्थ ,
दही , आंबवलेले
पदार्थ , तेलकट पदार्थ, मिरची,मसालेदार पदार्थ , बेकरीचे पदार्थ , फास्ट फूड ,लोणचे , पापड .
मिल्क शेक , दूध
आणि फळ एकत्र करून खाणे , शिकरण .
अति उपवास, अवेळी
जेवण .
विहार
अल्प झोप - अति जागरण .
अति प्रमाणात व्यायाम ताकतीपेक्षा जास्त.
अति व्यवाय - नियम सोडून मैथुन करणे .
अतिशय काम / श्रम करणे .
अतिशय पायी चालणे .
वेड्या वाकड्या हालचाली करणे .
मलमूत्रादी वेग रोखणे . यामध्ये लघवीला
किंवा संडासला आले असता न जाणे .
मलमूत्रादि वेग आले नसताना ते निर्माण करणे
.
अतिशय वजनदार वस्तू डोक्यावरून किंवा
खांद्यावरून नेणे.
अतिअध्यायन - एकाच स्थितीमध्ये - एकाच
ठिकाणी खूप वेळ बसणे.
अतिशय मोठ्याने बोलणे . मानेच्या आजाराशी
निगडित .
अतिशय वेगात धावणे.
खड्यावरून / लांब किंवा उंचीवरून उड्या
मारणे .
उड्या मारत चालणे .
अति प्रमाणात पोहणे .
वाहनावरून
गाडी वरून अति प्रमाणात प्रवास
अति प्रमाणात पायी चालणे .
मानसीक
अति प्रमाणात चिंता ,
शोक , क्रोध, भय ,
काम , अति त्रास .
काळ
पावसाळा , पावसाळा
ऋतू शिवाय आकाशात ढग आल्यास .
आघात
उंचीवरून , गाडीवरून
पडणे .
सांधे , हाड
मोडणे .
अति दाब पडणे किंवा दाबले जाणे .
मार लागणे .
भाग 2 मध्ये
ज्या कारणामुळे वाताचे आजार / मणक्याचे / सांध्यांचे आजार होऊ शकतात याबाबत आपण
माहिती घेतली . भाग 3 मध्ये यामध्ये दिसणारी लक्षणे याबाबत
माहिती घेणार आहोत .
वैद्य श्रीधर राजेंद्र पवार ,
आरोग्यवेल आयुर्वेद ,
रहिमतपूर , सातारा
मोबा 9404405706, 9595599878
आरोग्यवेल आयुर्वेद फेसबुक पेज
Its very important or needful
उत्तर द्याहटवा