मुख्य सामग्रीवर वगळा

पावसाळा आणि आयुर्वेद 1   
Rainy season and Ayurveda 




     वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही.

असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे.

आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रकोपावर ’बस्ती’ हा पंचकर्मांपैकी एक महत्वाचा उपक्रम आयुर्वेदात सांगितलेला आहे. विविध औषधांनी युक्त काढ्यांचा किंवा तेलाचा एनिमा विधिपूर्वक घेणे असे सोप्या भाषेत सांगता येईल. या बस्तीने अनेक संभाव्य रोगांचा प्रतिबंध होतो. तसेच वाताचे विकारही बरे होतात.

पावसाळ्यात भूक कमीच लागते. म्हणून भोजनासाठी अगदी हलका आहार घ्यावा. नविन धान्य वापरु नये. एक वर्ष जुने झालेले धान्य वापरावे. नविन धान्य वापरायचेच असेल तर ते भाजून घेऊन नंतर वापरात आणावे. आहारसुद्धा अगदी मोजकाच घ्यावा. जेवणही ठरलेल्या वेळीच घ्यावे. गोड पदार्थ, विविध पक्वान्ने, उडीदासारखे जड पदार्थ, तळलेले, आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत. कांदा खाऊ नये. सुंठ, हिंग, जिरे, मिरे, आले, लसूण, पुदिना, लिंबू ह्यांचा आहारात भरपूर वापर करावा. त्यामुळे भूक चांगली लागून अन्नपचनही चांगले होते. लसूण हा पावसाळ्यात उत्तम औषधी आहे. तो वातनाशक, भूक वाढविणारा आहे. म्हणून कच्चा लसूण, लसणाची चटणी, फोडणी अशा विविध प्रकारे लसूण वापरावा.

या ऋतूत पालेभाज्या जास्त वापरू नयेत. पालेभाज्या सारक असतात. तसेच त्या नीट धुतल्या गेल्या नाहीत तर पानांना माती, घाण तशीच रहाते व ती जेवणावाटे पोटात जाते. म्हणून पालेभाज्यांचा वापर शक्यतो कमीच करावा. गायीचे तूप भरपूर घ्यावे. गायीचे तूप स्निग्ध, भूक वाढविणारे, शक्तिवर्धक असते. म्हणून ते जेवणात नियमित घ्यावे. इडली, वडा, उत्तप्पा, डोसा, शेव, भजी, कचोरी, भेळ, पाणीपुरी, पाव, ब्रेड, दही, आंबट, तिखट, तळलेले पदार्थ, ह्यांचा अजिबात वापर करु नये. तसेच उघड्यावरचे, हातगाडीवरचे पदार्थ खाऊ नयेत. या पदार्थांनी रोगराई पसरण्याची शक्यता असते. तोंडाला चव यावी म्हणून कैरी, लिंबू, आले यापासून केलेल्या लोणच्यांचा अगदी थोडा वापर करावा. ह्या ऋतूत मांसाहार करू नये. मांसाहाराचे पदार्थ पचायला जड, तेल, तिखट भरपूर असलेले असतात .

खरे तर ह्या ऋतूत भूक कमी लागते, अग्नी मंद असतो म्हणून भारतीय संस्कृतीत ह्या ऋतूत उपवास जास्त सांगितलेले आहेत. पण आपले उपवासाचे पदार्थ भगर, साबुदाणा, शेंगदाणे, रताळी, शिंगाडे हे पदार्थ इतके जड असतात की असे उपवास करावेत की नाहीत यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आपल्या परंपरेमध्ये सांगितलेला उपवासामागील मूळ हेतूच नष्ट झालेला आहे. असो.

ह्या ऋतूत पाणी अतिशय गढूळ असते. पाण्यामुळे विविध रोग पसरण्याची शक्यता असते. म्हणून पाणी निर्जंतुक, फिल्टर करून किंवा गाळून, उकळून वापरावे. पहिला पाऊस पडून गेल्यावर नंतर एका भांड्यात वर फडके लावून त्यामध्ये पावसाचे पाणी साठवावे. याला आयुर्वेदात ’दिव्य जल’ असे म्हटले आहे. त्या पाण्याचा जमिनीशी कोणताही संपर्क आलेला नसतो. त्यामुळे त्यात कोणताही दोष येत नाही. हे शुद्ध पाणी वापरण्यास हरकत नाही. माठातले किंवा फ्रीजमधले पाणी वापरू नये. पाणी थोडे कोमटच प्यावे. कोमट पाणी पचायला हलके असते.

या ऋतूत घरात धूपन करावे. ऊद, गुग्गुळ, निंबाची पाने जाळल्यामुळे आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते.

अशाप्रकारे पथ्यकर आहार विहाराचे पालन केल्यास पावसाळा सृष्टीप्रमाणेच आपणासही उत्साहित करणारा, टवटवी आणणारा ठरेल .

वैद्य श्रीधर राजेंद्र पवार
आरोग्यवेल आयुर्वेद , रहिमतपूर , सातारा
मोबा :- ९४०४४०५७०६, ९५९५५९९८७८ .

  



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला... हिवाळा हा थंडगार आणि आल्हाददायक असं वातावरण घेऊन येतो. पण, थंडीच्या दिवसांत आपलं शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराची देखभाल करून आपण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. चला तर मग, हिवाळ्यात आयुर्वेदिक पद्धतींनी आरोग्य कसं जपावं हे जाणून घेऊया. हिवाळा आणि दोषांची समज आयुर्वेदानुसार, हिवाळा मुख्यतः वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे. वात दोष हा थंड, रुक्ष, हलका आणि गतिशील असतो, तर कफ दोष स्थिर आणि ओलसर असतो. हिवाळ्यात शरीरात थंडी आणि रुक्षता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला गरम, स्थिर आणि स्निग्ध ठेवणं गरजेचं असतं. १. उष्ण आणि पौष्टिक आहाराचा अवलंब करा हिवाळ्यात आपलं पचनशक्ती अधिक मजबूत असते. यामुळे शरीर गरम आणि पौष्टिक पदार्थांना अधिक चांगल्या प्रकारे पचवू शकतं. गरम पदार्थ खा : सुप, पेज, खिचडी अशा गरम पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये रूट व्हेजिटेबल्स, डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करा. तुप आणि तेलाचा वापर करा : गायीचं तूप, खोबरेल तेल, तिळाचे तेल हिवाळ्यात विशेषतः उपयुक्त असत...

हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय

  हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय हिवाळ्याच्या थंडीमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, आणि त्यामध्ये हातापायांना पडणाऱ्या भेगा ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. आयुर्वेदानुसार, हिवाळ्याच्या ऋतूत "वात दोष" वाढतो, जो थंड, कोरडा, आणि कठोर गुणधर्मांनी युक्त असतो. हिवाळ्यातील थंड व कोरडे वातावरण त्वचेला हानी पोहोचवते आणि यामुळे त्वचा कोरडी होऊन भेगा पडतात. चला जाणून घेऊया, हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. हातापायांना भेगा का पडतात? आयुर्वेदिक कारणे वात दोषाचा प्रभाव आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात वात दोष तीव्र होतो, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. वात दोषामुळे त्वचेचा ताण वाढतो आणि त्वचेमधील लवचिकता कमी होते, ज्यामुळे भेगा पडतात. त्वचेतील आर्द्रतेची कमतरता हिवाळ्यात त्वचेमधील नैसर्गिक ओलावा हरवतो, ज्यामुळे त्वचा कठोर व कोरडी होते. वात दोष वाढल्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, आणि त्वचेवर ताण निर्माण होतो, ज्यामुळे हातापायांवर भेगा पडू शकतात. अयोग्य आहार आणि जीवनशैली वातवर्धक पदार्थांचा (जसे की थंड, को...