हिवाळ्यात अभ्यंगाचे फायदे: त्वचा व शरीरासाठी संजीवनी
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे त्वचा कोरडी पडते, सांधेदुखी, शरीरातील stiffness, आणि रक्ताभिसरणाची समस्या वाढते. अशा वेळी अभ्यंग, म्हणजेच संपूर्ण शरीराला तेल लावून मालिश करणे, आयुर्वेदात एक अत्यंत फायदेशीर उपाय मानला जातो.
चला जाणून घेऊया, हिवाळ्यात अभ्यंगाचे काही मुख्य फायदे.
1. त्वचेला पोषण आणि आर्द्रता मिळते
- अभ्यंगामध्ये तिळाचे तेल, नारळ तेल, किंवा बदाम तेल यांचा वापर केल्यास त्वचेची ओलावा टिकून राहते. त्वचा मऊ आणि लवचिक बनते.
2. रक्ताभिसरण सुधारते
- संपूर्ण शरीराला तेल लावल्याने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे शरीराला उब मिळते आणि थंडीत ऊर्जा वाढते.
3. सांधेदुखी कमी करते
- हिवाळ्यात वात दोष वाढल्याने सांधेदुखीची समस्या होते. अभ्यंगामुळे वात संतुलित होतो, सांध्यांचा लवचिकपणा वाढतो, आणि दुखण्यावर आराम मिळतो.
4. ताणतणाव कमी करते
- अभ्यंगामुळे शरीरातील स्नायू मोकळे होतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीर अधिक आरामदायक वाटते.
5. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते
- नियमित अभ्यंग केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा