मुख्य सामग्रीवर वगळा

जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबर - जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा

 जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबर - जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा 

१९९९ साली World Heart Federation ने हृदयाचे आरोग्य व हृदयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून घोषित केला आहे. एकविसाव्या शतकामधील धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणावामुळे सध्याच्या काळामध्ये हृदय आणि हृदयाशी निगडीत आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांमध्ये आता विसीच्या आसपासच्या वयाचे बरेच जण आढळतात.  

         हृदय हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे, जन्मापासून मृत्युपर्यंत हृदयास निरंतर कार्य करावे लागते. त्यामुळे या शरीरातील महत्वाच्या अवयवाची काळजी घेणे गरजेचे आहे.

         जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयाचे आरोग्य व हृदयरोग याबाबतची माहिती घेऊया –

हृदयाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी / हृदयरोग होऊ नये म्हणून-

हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. आपले शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज कमीत कमी ३० मिनिट व्यायाम असावा, यामध्ये चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे याचा समावेश असावा. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्राणायाम, ओमकार, योगसाधना हे करता येते.

       सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला आवडत असणाऱ्या छंदामध्ये स्वता:ला गुंतवूण घ्यावे. प्राणायाम, योगसाधना, संगीत याचा वापर करावा.

       आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पंचकर्म उपचारांचे वर्णन केले आहे, यातील बस्ती, स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, हृद्यबस्ती याचा हृदयाला बळ देण्यासाठी, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये व हृदयविकारामध्ये फायदेशीर आहे.




हृदयविकार होण्याची कारणे –

हृदयविकार होण्याची कारणे अनेक आहेत त्यातील महत्त्वाची कारणे – जीवनामध्ये वाढते ताणताणाव, बदलती जीवनशैली तसेच -

  • आहारामध्ये अति मसालेदार, तेलकट पदार्थ
  • धूम्रपान करणे
  • अति प्रमाणात जागरण
  • मधूमेह
  • लठ्ठपणा
  • शारिरीक श्रमाची कमतरता
  • अनुवंशिकता
  • इच्छेविरुद्ध घडलेल्या गोष्टी / प्रेमभंग  इ.

हृदयविकारांची लक्षणे –

हृदयविकारांमध्ये लक्षणे ओळखणे फार अवघड असते साधारण दिसणारी अनेक लक्षणे हृदयरोगामध्ये  असू शकतात आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. पण साधारणपणे खालील लक्षणे असू शकतात -

  • छातीमध्ये खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
  • चालताना दम लागणे.
  • घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
  • साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
  • इतर लक्षणे जसे मळमळ, ऊलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
  • रक्तदाब कमी अथवा जास्त वाढलेला दिसून येतो.

                   या व्यतिरिक्त देखील काही लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी दिसू शकतात.

हृदयरोग झाला हे ठरवायचे कसे-

  • रुग्णाची तपासणी करून आणि हृदयाची स्पंदने मोजून आणि रक्तदाब कमी किंवा जास्त झाला असेल तर.
  • इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
  • ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.
  • हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
  • छातीचा एक्स-रे देखील घेतला जातो.
  • हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे.
  • हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामधील अडथळे जाणून घेण्यसाठी कोरोनरी एंजियोग्राफी  हि चाचणी केली जाते.

जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा 

वैद्य श्रीधर राजेंद्र पवार,

आरोग्यवेल आयुर्वेद, सातारा आणि रहिमतपूर.

मोबा-  ९४०४४०५७०६

 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿

  पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿   पंचकर्म ही आयुर्वेदामधील एक अत्यंत प्रभावी आणि पूर्णपणे शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी करणारी चिकित्सा पद्धत आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (आमा) बाहेर फेकले जातात आणि शरीराचे संतुलन पुनर्संचयित होते. यामुळे आरोग्यात सुधारणा होऊन समग्र कल्याण प्राप्त होते.   पंचकर्माचे फायदे:  1. शरीराची सखोल शुद्धी 🧘‍♀️      पंचकर्माद्वारे शरीरात जमलेले विषारी पदार्थ (आम) बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराच्या सर्व स्तरांवर शुद्धी होऊन आरोग्यात सुधारणा होते.   2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे 💪      पंचकर्मामुळे शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलित होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.   3. पाचनशक्ती आणि चयापचय सुधारणे 🍃      पंचकर्मातील विरेचन आणि बस्ती या चिकित्सांमुळे पाचनशक्ती सुधारते आणि चयापचय प्रक्रिया संतुलित होते.   4. ताण-तणाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळवणे 🧠       शिरोधारा (कपाळावर...

रक्तमोक्षण पंचकर्म: आयुर्वेदातील रक्तशुद्धीकरणाची प्रभावी पद्धत

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा शरीरातील दोष आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. पंचकर्मातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रक्तमोक्षण . हे एक असे उपचार आहे ज्यामुळे रक्तशुद्धीकरण करून शरीरातील विकार दूर केले जातात. रक्तमोक्षणामुळे त्वचाविकार, संधिवात, आणि पित्ताशी संबंधित विकारांवर प्रभावी उपचार केला जातो. चला तर मग जाणून घेऊया रक्तमोक्षण पंचकर्माचे महत्त्व, फायदे आणि प्रक्रिया. रक्तमोक्षण म्हणजे काय? रक्तमोक्षण हा पंचकर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत शरीरातील दूषित रक्त बाहेर काढले जाते, ज्यामुळे शरीरातील दोषांचे (विशेषतः पित्त आणि रक्तज विकार) शुद्धीकरण होते. रक्तमोक्षणासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, जसे की शृंग - कपिंग थेरपी ( सिंंगाचा वापर), जलौका (जळू), किंवा सुईद्वारे रक्त काढणे. या पद्धतीने शरीरातील दूषित रक्त बाहेर काढून नवीन रक्ताची निर्मिती होते आणि विविध विकारांवर उपचार केला जातो. रक्तमोक्षण पंचकर्माचे फायदे रक्तशुद्धीकरण : रक्तमोक्षणामुळे दूषित रक्त बाहेर काढले जाते आणि शरीरात शुद्ध रक्ताचा प्रवाह सुरू होतो. यामुळे त्वचेवरील विकार, पित्ती, आणि अन्य रक्तवि...

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...