जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबर - जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा
१९९९ साली World Heart Federation ने हृदयाचे
आरोग्य व हृदयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन
म्हणून घोषित केला आहे. एकविसाव्या शतकामधील धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणावामुळे सध्याच्या
काळामध्ये हृदय आणि हृदयाशी निगडीत आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून
येते. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांमध्ये आता विसीच्या आसपासच्या वयाचे
बरेच जण आढळतात.
हृदय
हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे, जन्मापासून मृत्युपर्यंत हृदयास निरंतर कार्य
करावे लागते. त्यामुळे या शरीरातील महत्वाच्या अवयवाची काळजी घेणे गरजेचे आहे.
जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयाचे आरोग्य
व हृदयरोग याबाबतची माहिती घेऊया –
हृदयाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी / हृदयरोग होऊ नये
म्हणून-
हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आपले
शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. आपले शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी
नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज कमीत कमी ३० मिनिट व्यायाम असावा, यामध्ये
चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे याचा समावेश असावा. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार
प्राणायाम, ओमकार, योगसाधना हे करता येते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक
आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला आवडत असणाऱ्या छंदामध्ये स्वता:ला गुंतवूण घ्यावे. प्राणायाम,
योगसाधना, संगीत याचा वापर करावा.
आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये शारीरिक
व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पंचकर्म उपचारांचे वर्णन केले आहे, यातील
बस्ती, स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, हृद्यबस्ती याचा हृदयाला बळ देण्यासाठी, हृदयाचे
आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये व हृदयविकारामध्ये फायदेशीर आहे.
हृदयविकार होण्याची कारणे –
हृदयविकार होण्याची कारणे अनेक आहेत
त्यातील महत्त्वाची कारणे – जीवनामध्ये वाढते ताणताणाव, बदलती जीवनशैली तसेच -
- आहारामध्ये अति मसालेदार, तेलकट
पदार्थ
- धूम्रपान करणे
- अति प्रमाणात जागरण
- मधूमेह
- लठ्ठपणा
- शारिरीक श्रमाची कमतरता
- अनुवंशिकता
- इच्छेविरुद्ध घडलेल्या गोष्टी / प्रेमभंग इ.
हृदयविकारांची लक्षणे –
हृदयविकारांमध्ये लक्षणे ओळखणे फार अवघड असते साधारण
दिसणारी अनेक लक्षणे हृदयरोगामध्ये असू
शकतात आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. पण साधारणपणे खालील लक्षणे असू शकतात -
- छातीमध्ये खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास
त्रास होतो.
- चालताना दम लागणे.
- घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही
देखील काही लक्षणे आहेत.
- साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा
पाठीच्या मणक्यात असतात तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
- इतर लक्षणे जसे मळमळ, ऊलट्या, अस्वस्थता, कफ,
कंप अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
- रक्तदाब कमी अथवा जास्त वाढलेला दिसून येतो.
या व्यतिरिक्त देखील काही
लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी दिसू शकतात.
हृदयरोग झाला
हे ठरवायचे कसे-
- रुग्णाची तपासणी करून आणि हृदयाची स्पंदने मोजून
आणि रक्तदाब कमी किंवा जास्त झाला असेल तर.
- इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
- ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे
हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.
- हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते
रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
- छातीचा एक्स-रे देखील घेतला जातो.
- हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो.
ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे.
- हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामधील
अडथळे जाणून घेण्यसाठी कोरोनरी एंजियोग्राफी
हि चाचणी केली जाते.
जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा
वैद्य
श्रीधर राजेंद्र पवार,
आरोग्यवेल
आयुर्वेद, सातारा आणि रहिमतपूर.
मोबा- ९४०४४०५७०६
Very Nice Information 👍
उत्तर द्याहटवा