नाकातून
रक्त येणे Epistaxis .
उन्हाळा
या ऋतूमध्ये सामान्यता दिसून येणारी समस्या म्हणजे नाकातून रक्त येणे .
उन्हाळ्यामध्ये
वातावरणामध्ये असणारी उष्णता आणि कोरडेपणा यामुळे शरीर आणि नाकपुड्या यामध्ये
कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणारा ओलावा कमी होवून तिथे जास्त
प्रमाणात कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या अतिशय
लहान व त्वचेला लागून असतात त्यामुळे त्यांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी तिथे
ओलावा आणे आवश्यक असते . यामध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी
घेणे गरजेचे असते .
नाकातून
रक्त येण्याची कारणे ?
नाकाला जखम होणे
कष्टाचं काम
उच्च रक्तदाब
उंचीवरच्या प्रदेशात
जाणे
उन्हामध्ये
काम केल्यानंतर / उन्हामध्ये फिरल्याने
नाकातून
रक्त आल्यास करायचे उपाय
खाली बसावे
थोडेसे पुढे झुकावे
म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही
थंड, ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित होऊन रक्तस्त्राव थांबेल.
रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर, त्या नाकपुडीच्या वरच्या भागात घट्ट दाबून
धरावे.
दोन्ही नाकपुड्यांतून
रक्त येत असेल तर,
आपल्या नाकपुड्या किमान दहा मिनिटे दाबून धराव्यात.
तरीही रक्तस्त्राव चालूच
राहिल्यास,
आणखी दहा मिनिटे दाब द्यावा.
रक्तस्त्राव हा नाकाला थेट झालेल्या जखमेमुळं झाला असेल तर, केवळ हलकाच दाब द्यावा.
जोरदार रक्तस्त्राव
चालूच राहिल्यास किंवा नाकातून वारंवार चालू राहिल्यास, एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नाकातून रक्त येऊ नये म्हणून
कोरडेपणा निर्माण होत असल्यास गाईच्या तुपाचे २ -२ थेंब
दोन्ही नाकपुडी मध्ये सोडावे .
नारिकेल तेलाचे २-२ थेंब दोन्ही नाकपुडी मध्ये सोडावे .
बाहेर उन्हामध्ये जाताना तेल / तुपाचे थेंब नाकपुडीत सोडून
बाहेर पडावे .
उष्ण हवेच्या झळा पासून वाचण्यासाठी नाकाला रुमाल बांधावा .
आरोग्यावेल आयुर्वेद, रहिमतपूर, सातारा .
वैद्य श्रीधर राजेंद्र पवार
९४०४४०५७०६ , ९५९५५९९८७८
अतिक्षय उपयुवत माहिती
उत्तर द्याहटवा👌☝👍👍
उत्तर द्याहटवा