मुख्य सामग्रीवर वगळा

बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी - सुवर्णप्राशन

 
 सुवर्णप्राशन संस्कार हे मुलांचे सर्वांगीण आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने विधी आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन शास्त्रामध्ये रुजलेले, सुवर्णप्राशन हे सोने आणि इतर औषधीघटक  असलेले एक विशेष मिश्रण  आहे . चला या विधीचा खोलात जाऊन विचार करूया आणि ते जाणून घेऊया. 


सुवर्णप्राशन म्हणजे काय ?
                    सोन्याचे भस्म हे वचा आणि ब्राम्ही या प्रमुख घटकासह इतर औषधी वनस्पती द्रव्यांसोबत एकत्र करून मध आणि तूप यासमवेत एकजीव असे लेह ( चाटण ) स्वरूपाचे मिश्रण बनवले जाते .
 
सुवर्ण प्राशन कोणाला देऊ शकतो :-
                      नवजात बालकापासून ते १६ वयो वर्षाच्या मुलापर्यंत सर्वाना आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो.
 
सुवर्णप्राशनाचे फायदे -
सुवर्णप्राशनं हि ऐतत् मेधाग्निबलवर्धनम् ।
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम् ।।
काश्यप
संहिता

 
1.मेंदूचा विकास

लहान मुलांचा मेंदूचा विकास त्यांना दिल्या जाणाऱ्या आहारावर आहे. त्यामध्ये जर सुवर्ण प्राशन दिल्याने मेंदूचा विकास होण्यास मदत मिळते.


2.आकलन क्षमता सुधारते - 

लहान मुलांच्या मध्ये चंचलता खूप प्रमाणात असते, त्यामध्ये स्थिरता आणून आकलन (एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता) वाढण्यास मदत होते.


3.पचन सुधारते - 

चमचमीत पदार्थ (वेफर्स, बिस्किटे, कॅडबरी) असे पदार्थ खाण्याचे प्रमाण लहान मुलांच्या मध्ये जास्त असते. याचा परिणाम म्हणून लहान वयात येणार लठ्ठपणा किंवा इतर आजारापासून बचाव करण्याचे काम घडून येते.


4.रोगप्रतिकारशक्ती वाढते -

 लहान मुलांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते याचे प्रमुख कारण कमकुवत रोगप्रतिकारशक्ती हे असते. वातावरणातील बादलांपासून बचाव होतो - ऋतू बदलताना वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण खूप आहे . यामध्ये लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्यामुळे बदललेल्या वातावरणाशी मुले सहज जुळवून घेऊ शकतात.


5.घातक गोष्टीपासून बचाव होतो-

आताच्या काळात शेतामध्ये जो भाजीपाला पिकवला जातो तो पूर्णतः शेंद्रिय खते वापरून पिकवला जात नाही त्यामुळे त्यास वापरल्या गेलेल्या रासायनिक खतांचा अवशेष त्यामध्ये असतो. असा भाजीपाला धुऊन , शिजवून जरी खाल्ला तरी काही प्रमाणात रासायनिक घटक शरीरात जात असतात, त्यापासून बचाव होण्यास सुवर्णप्राशन मदत करते .


6.वर्ण सुधारतो

आता इथे वर्ण याचा अर्थ रंग असे घेता त्यामुळे त्वचेवर तुकतुकीत पणा म्हणजे तजेलदार पणा निर्माण होतो.
अश्या प्रकारे सुवर्ण प्राशन हे एकूणच शरीराची वाढ, मेंदूची वाढ, ऋतू बदलात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण आणि शरीराचे बल वाढवण्याचे काम करते .


सुवर्णप्राशन कधी द्यावे
:-
सुवर्णप्राशन दररोज सकाळी देणे सर्वात फायदेशीर आहे, त्यासोबत प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला देता येते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला... हिवाळा हा थंडगार आणि आल्हाददायक असं वातावरण घेऊन येतो. पण, थंडीच्या दिवसांत आपलं शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराची देखभाल करून आपण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. चला तर मग, हिवाळ्यात आयुर्वेदिक पद्धतींनी आरोग्य कसं जपावं हे जाणून घेऊया. हिवाळा आणि दोषांची समज आयुर्वेदानुसार, हिवाळा मुख्यतः वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे. वात दोष हा थंड, रुक्ष, हलका आणि गतिशील असतो, तर कफ दोष स्थिर आणि ओलसर असतो. हिवाळ्यात शरीरात थंडी आणि रुक्षता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला गरम, स्थिर आणि स्निग्ध ठेवणं गरजेचं असतं. १. उष्ण आणि पौष्टिक आहाराचा अवलंब करा हिवाळ्यात आपलं पचनशक्ती अधिक मजबूत असते. यामुळे शरीर गरम आणि पौष्टिक पदार्थांना अधिक चांगल्या प्रकारे पचवू शकतं. गरम पदार्थ खा : सुप, पेज, खिचडी अशा गरम पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये रूट व्हेजिटेबल्स, डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करा. तुप आणि तेलाचा वापर करा : गायीचं तूप, खोबरेल तेल, तिळाचे तेल हिवाळ्यात विशेषतः उपयुक्त असत...

हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय

  हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय हिवाळ्याच्या थंडीमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, आणि त्यामध्ये हातापायांना पडणाऱ्या भेगा ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. आयुर्वेदानुसार, हिवाळ्याच्या ऋतूत "वात दोष" वाढतो, जो थंड, कोरडा, आणि कठोर गुणधर्मांनी युक्त असतो. हिवाळ्यातील थंड व कोरडे वातावरण त्वचेला हानी पोहोचवते आणि यामुळे त्वचा कोरडी होऊन भेगा पडतात. चला जाणून घेऊया, हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. हातापायांना भेगा का पडतात? आयुर्वेदिक कारणे वात दोषाचा प्रभाव आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात वात दोष तीव्र होतो, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. वात दोषामुळे त्वचेचा ताण वाढतो आणि त्वचेमधील लवचिकता कमी होते, ज्यामुळे भेगा पडतात. त्वचेतील आर्द्रतेची कमतरता हिवाळ्यात त्वचेमधील नैसर्गिक ओलावा हरवतो, ज्यामुळे त्वचा कठोर व कोरडी होते. वात दोष वाढल्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, आणि त्वचेवर ताण निर्माण होतो, ज्यामुळे हातापायांवर भेगा पडू शकतात. अयोग्य आहार आणि जीवनशैली वातवर्धक पदार्थांचा (जसे की थंड, को...