मुख्य सामग्रीवर वगळा

बाळगुटी - बालकांच्या आजारावरील प्राथमिक उपचार

अगदी पूर्वीपासून आपल्या आज्जी - पणजी पासून आपण ऐकत आलो आहोत, बाळ जन्माला आलं की घरात असलेल्या अनुभवी बायका बाळाला काही त्रास झाला किंवा बाळ खूप रडत असल तर त्याला बाळगुटी द्या म्हणून सल्ला देतात. याच बाळगुटी बद्दल आज जाणून घेऊया.

बाळगुटी मधील घटक-  


बाळगुटी मध्ये खारीक, बदाम, सुंठ, वेखंड, जेष्ठमध, सुरवारी हिरडा, हळद, अतीविष, मुरुडशेंग, पिंपळी, जायफळ, मयफळ, सागरगोटे, वावडिंग, अश्वगंधा, बेहडा, सोने यांचा समावेश असतो. साधारणपणे रोज आपण खारीक, बदाम, सुंठ, वेखंड, जेष्ठमध,अश्वगंधा, सोने ही औषधे उगाळून देऊ शकतो.

बाळगुटी कधी द्यावी

बाळ सकाळी उठल्या उठल्या द्यावी.

बाळगुटी उगाळण्याची पद्धत आणि फायदे -

सहाण गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. आपले हातही स्वच्छ धुवून घ्यावेत. हाताची नखे वाढलेली नसावीत. तसेच वरील सर्व औषधी गरमपाण्यात चांगली धुवून सुकवून घ्यावी. नंतर आईच्या दुधाचे ५ ते १० थेंब घेऊन त्यात बाळ जेवढ्या महिन्याचे असेल तेवढे वेढा प्रत्येक औषधांचा द्यावा. आईला जर दूध पुरेसे येत नसेल तर गाईच्या दुधातून बाळगुटी द्यावी.


वेखंड - प्रथम सहाणेवर आईच्या दुधाचे २ थेम्ब टाकावेत व त्यावर वेखंड उगाळून घ्यावे - साधारणतः ५ ते ६ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
वेखंडामुळे - बाळांची मेधा, आकलनशक्ती वाढते, उच्चार स्पष्ट होतात, तसेच जंतुसंसर्ग कमी हतो.

पिंपळी - नंतर परत एक ते २ थेम्ब सहाणेवर दूध घेऊन पिंपळी (लेंडी पिंपळी) उगाळावी साधारणतः ५ ते ६ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
पिंपळी - मुख्य उपयोग श्वसन आणि पचन संस्थेसाठी होतो. मुलांचा सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. भूक व्यवस्थित लागते. अजीर्ण पोटदुखी कमी होते. मुलांना सर्दी खोकला झाला असेल किंवा भूक लागत नसेल तर पिंपळी चे प्रमाण थोडेसे वाढवावे.

मायफळ - सहाणेवर दुधात मायफळ उगाळून घ्यावे. साधारणतः ५ ते ६ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
मायफळ - उलट्या - जुलाबावर गुणकारी. कफ झाल्या असल्यास ह्याच्या सेवनाने अराम मिळतो.

अश्वगंधा - एक थेम्ब दुधात साधारणतः ५ ते ६ वळे अश्वगंध उगाळून घ्यावे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
अश्वगंधा - ताकद वाढवणारे तसेच शुक्रजंतूंचे पोषण करणारे आहे. नियमित सेवनाने बाळ बाळसे धरते. आणि बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

काकडशिंगी - एक थेम्ब दुधात काकडशिंगी उगाळून घ्यावे. साधारणतः ५ ते ६ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
काकडशिंगी - कफ, वातशामक आहे. खोकला, उचकी, उलटीचा त्रास कमी करते, बाळांना दात येताना होणाऱ्या त्रासांवर उपयुक्त आहे.

बदाम - ८ते १० तास पाण्यात भिजवून सोललेला बदाम एक थेम्ब दुधात उगाळून घ्यावा. २ महिन्यापर्यंत पाव बदाम उगवळावा ८ महिन्यानंतर प्रमाण अर्धा बदाम करावे. चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
बदाम - मेंदू आणि बुद्धीस हितकर.

खारीक - एक थेम्ब दुधात खारीक उगाळून घ्यावे.साधारणतः ५ ते ६ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
खारीक - वात पित्त शामक व शीतल गुणधर्माची असते - शरीराला आवश्यक स्निग्धता देते ताकद वाढवते, हाडे बळकट करते.

सुंठ - एक थेम्ब दुधात सुंठ उगाळून घ्यावी. साधारणतः ५ ते ६ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
सुंठ - पचनक्रियेस उपयुक्त. वातशामक आहे तसेच बाळाला शी नीट व्हायला मदत होते. आवाज सुधारण्यास मदत होते. तसेच खोकला सर्दी साठी सुद्धा गुणकारी.

हळद -एक थेम्ब दुधात हळद उगाळून घ्यावी.साधारणतः ५ ते ६ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.

हळद - ही कफ, वातशामक आणि रक्तशुद्ध करणारी तसेच यकृताची कार्यक्षमता वाढवणारी आहे. जंताना प्रतिबंधक आहे. त्वचा विकार किंवा स्किन ऍलर्जी होत नाही. त्वचा उजळण्यासाठी व त्वचेचे आरोग्य नीट राहण्यासाठी हळद उपयोगी असते.

जायफळ - एक थेम्ब दुधात जायफळ उगाळून घ्यावे.साधारणतः २ ते ३ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे.
जायफळ - झोप शांत लागते. बुद्धी आणि स्मरणशक्ती विकसित होण्यास मदत होते. मलप्रवृत्ती घट्ट करण्यास मदत करते. जायफळाच्या अति सेवनाने बाळाच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे जायफळाचे प्रमाण कमी ठेवावे.

मग उगाळलेल्या गुटीत अर्धा चमचा ते एक चमचा दूध मिक्स करावं ज्यामुळे ते पिताना त्रास होणार नाही. बाळाला गुटी जात नसल्यास थोडस मध त्यात घालू शकतो ज्यामुळे बाळ ते पिण्यास त्रास देणार नाही.

वरील गुटीत आपण बदाम आणि खारीक ह्यांचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता त्यामुळे गुटीला चांगली चव येते आणि बाळ ते आनंदाने खाते.

बाळगुटी वापरताना घ्यावयाची काळजी - 

- गुटी बनवण्यासाठी लागणारे सर्व सामान गरम पाण्यात स्वच्छ धुवून (Sterilized) सुकवून मगच वापरावे.

- गुटी उगाळल्या नंतर सर्व औषधी पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून एखाद्या हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

- वापरण्यात येणारी सहाणही स्वच्छ धुवून सुकवून बंद डब्यात किंवा स्वच्छ फडक्यात गुंडाळून ठेवावी.

- परत वापराच्या वेळी सर्व सामान धुवून स्वच्छ करून सुकवून वापरावे.


वर दिलेल्या सर्व नियमांचे योग्य पालन करून बाळाला बाळगुटी दिल्यास बाळाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग न होता बाळाला दिलेल्या औषधींचा योग्य तो फायदा मिळून बाळ आनंदी आणि सुदृढ राहू शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला... हिवाळा हा थंडगार आणि आल्हाददायक असं वातावरण घेऊन येतो. पण, थंडीच्या दिवसांत आपलं शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराची देखभाल करून आपण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. चला तर मग, हिवाळ्यात आयुर्वेदिक पद्धतींनी आरोग्य कसं जपावं हे जाणून घेऊया. हिवाळा आणि दोषांची समज आयुर्वेदानुसार, हिवाळा मुख्यतः वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे. वात दोष हा थंड, रुक्ष, हलका आणि गतिशील असतो, तर कफ दोष स्थिर आणि ओलसर असतो. हिवाळ्यात शरीरात थंडी आणि रुक्षता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला गरम, स्थिर आणि स्निग्ध ठेवणं गरजेचं असतं. १. उष्ण आणि पौष्टिक आहाराचा अवलंब करा हिवाळ्यात आपलं पचनशक्ती अधिक मजबूत असते. यामुळे शरीर गरम आणि पौष्टिक पदार्थांना अधिक चांगल्या प्रकारे पचवू शकतं. गरम पदार्थ खा : सुप, पेज, खिचडी अशा गरम पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये रूट व्हेजिटेबल्स, डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करा. तुप आणि तेलाचा वापर करा : गायीचं तूप, खोबरेल तेल, तिळाचे तेल हिवाळ्यात विशेषतः उपयुक्त असत...

हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय

  हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय हिवाळ्याच्या थंडीमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, आणि त्यामध्ये हातापायांना पडणाऱ्या भेगा ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. आयुर्वेदानुसार, हिवाळ्याच्या ऋतूत "वात दोष" वाढतो, जो थंड, कोरडा, आणि कठोर गुणधर्मांनी युक्त असतो. हिवाळ्यातील थंड व कोरडे वातावरण त्वचेला हानी पोहोचवते आणि यामुळे त्वचा कोरडी होऊन भेगा पडतात. चला जाणून घेऊया, हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. हातापायांना भेगा का पडतात? आयुर्वेदिक कारणे वात दोषाचा प्रभाव आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात वात दोष तीव्र होतो, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. वात दोषामुळे त्वचेचा ताण वाढतो आणि त्वचेमधील लवचिकता कमी होते, ज्यामुळे भेगा पडतात. त्वचेतील आर्द्रतेची कमतरता हिवाळ्यात त्वचेमधील नैसर्गिक ओलावा हरवतो, ज्यामुळे त्वचा कठोर व कोरडी होते. वात दोष वाढल्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, आणि त्वचेवर ताण निर्माण होतो, ज्यामुळे हातापायांवर भेगा पडू शकतात. अयोग्य आहार आणि जीवनशैली वातवर्धक पदार्थांचा (जसे की थंड, को...