मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाळगुटी - बालकांच्या आजारावरील प्राथमिक उपचार

अगदी पूर्वीपासून आपल्या आज्जी - पणजी पासून आपण ऐकत आलो आहोत , बाळ जन्माला आलं की घरात असलेल्या अनुभवी बायका बाळाला काही त्रास झाला किंवा बाळ खूप रडत असल तर त्याला बाळगुटी द्या म्हणून सल्ला देतात. याच बाळगुटी बद्दल आज जाणून घेऊया. बाळगुटी मधील घटक-   बाळगुटी मध्ये खारीक , बदाम , सुंठ , वेखंड , जेष्ठमध , सुरवारी हिरडा , हळद , अतीविष , मुरुडशेंग , पिंपळी , जायफळ , मयफळ , सागरगोटे , वावडिंग , अश्वगंधा , बेहडा , सोने यांचा समावेश असतो. साधारणपणे रोज आपण खारीक , बदाम , सुंठ , वेखंड , जेष्ठमध , अश्वगंधा , सोने ही औषधे उगाळून देऊ शकतो. बाळगुटी कधी द्यावी ?  बाळ सकाळी उठल्या उठल्या द्यावी. बाळगुटी उगाळण्याची पद्धत आणि फायदे - सहाण गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. आपले हातही स्वच्छ धुवून घ्यावेत. हाताची नखे वाढलेली नसावीत. तसेच वरील सर्व औषधी गरमपाण्यात चांगली धुवून सुकवून घ्यावी. नंतर आईच्या दुधाचे ५ ते १० थेंब घेऊन त्यात बाळ जेवढ्या महिन्याचे असेल तेवढे वेढा प्रत्येक औषधांचा द्यावा. आईला जर दूध पुरेसे येत नसेल तर गाईच्या दुधातून बाळगुटी द्यावी . वेखंड - प्रथम सहाणेवर ...

बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी - सुवर्णप्राशन

    सुवर्णप्राशन संस्कार हे मुलांचे सर्वांगीण आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने विधी आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन शास्त्रामध्ये रुजलेले , सुवर्णप्राशन हे सोने आणि इतर औषधीघटक   असलेले एक विशेष मिश्रण   आहे . चला या विधीचा खोलात जाऊन विचार करूया आणि ते जाणून घेऊया.   सुवर्णप्राशन म्हणजे काय ?                     सोन्याचे भस्म हे वचा आणि ब्राम्ही या प्रमुख घटकासह इतर औषधी वनस्पती द्रव्यांसोबत एकत्र करून मध आणि तूप यासमवेत एकजीव असे लेह ( चाटण ) स्वरूपाचे मिश्रण बनवले जाते .   सुवर्ण प्राशन कोणाला देऊ शकतो :-                       नवजात बालकापासून ते १६ वयो वर्षाच्या मुलापर्यंत सर्वाना आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो.   सुवर्णप्राशनाचे फायदे - सुवर्णप्राशनं हि ऐतत् मेधाग्निबलवर्धनम् । आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम् ।। काश्यप संहिता   1...