मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
२५ मे जागतिक थायराइड दिवस आज समाजामध्ये थायराइड ग्रंथीशी निगडीत आजारांची संख्या बर्याच प्रमाणात वाढलेली दिसून येते . पूर्वीच्या काळी महिलांच्यामध्ये क्वचित दिसणारे आजार आज महिला , पुरुष , लहान मुले , मुले यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत . भारतातील थायराइड ग्रंथीशी निगडीत आजारांचे प्रमाण हे लोकसंखेच्या ११ % एवढे २०१८ च्या रिपोर्ट नुसार दिसून आलेले आहे . या वर्षभरात या मध्ये वाढ झाली असणार हे नक्कीच .        यामध्ये हायपो थायरोइड , हायपर थायराइड , थायराइड कॅन्सर , गलगंड हे महत्वाचे आजार दिसून येतात. आयुर्वेदानुसार सर्व आजारांचे महत्वाचे कारण आहाराचे पचन व्यवस्थित न होणे हे असते . थायराइडचे आजारामध्ये सुद्धा आहार पचन न होणे हे महत्वाचे कारण दिसते. आयोडीन ची कमतरता , हायपर थायराइड या आजारामध्ये दिसणारी लक्षणे या बाबत अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे . भूक वाढणे सारखा थकवा जाणवणे. उष्णता सहन न होणे . वारंवार जुलाब होणे , उलटी होणे हृदयाची धडधड वाढणे , काम केल्यावर श्वास वाढणे सर्व शरीरावर घाम येणे. केस गळणे. हायपो थायराइड या आजारामध्ये दिसणारी लक्षणे या बाबत ...
नाकातून रक्त येणे   Epistaxis . उन्हाळा या ऋतूमध्ये सामान्यता दिसून येणारी समस्या म्हणजे नाकातून रक्त येणे . उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये असणारी उष्णता आणि कोरडेपणा यामुळे शरीर आणि नाकपुड्या यामध्ये कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणारा ओलावा कमी होवून तिथे जास्त प्रमाणात कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या अतिशय लहान व त्वचेला लागून असतात त्यामुळे त्यांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी तिथे ओलावा आणे आवश्यक असते . यामध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते . नाकातून रक्त येण्याची कारणे ? नाकाला जखम होणे कष्टाचं काम उच्च रक्तदाब उंचीवरच्या प्रदेशात जाणे नाक फार जोरानं शिंकरणे उन्हामध्ये काम केल्यानंतर / उन्हामध्ये फिरल्याने नाकातून रक्त आल्यास करायचे उपाय खाली बसावे थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही थंड , ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित होऊन रक्तस्त्राव थांबेल. रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर , त...