मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबर - जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा

  जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबर - जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा  १९९९ साली World Heart Federation ने हृदयाचे आरोग्य व हृदयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून घोषित केला आहे. एकविसाव्या शतकामधील धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणावामुळे सध्याच्या काळामध्ये हृदय आणि हृदयाशी निगडीत आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांमध्ये आता विसीच्या आसपासच्या वयाचे बरेच जण आढळतात.             हृदय हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे, जन्मापासून मृत्युपर्यंत हृदयास निरंतर कार्य करावे लागते. त्यामुळे या शरीरातील महत्वाच्या अवयवाची काळजी घेणे गरजेचे आहे.          जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयाचे आरोग्य व हृदयरोग याबाबतची माहिती घेऊया – हृदयाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी / हृदयरोग होऊ नये म्हणून- हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. आपले शारीरिक आरोग्य टिकवण्यासा...